
गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी ग्रामगीतेच पालन करा त्यातून गाव, जिल्हा, राज्य, व साधुसंत, सामाजिक, राजकीय व्यक्तिमत्व कसे असावेत याचा त्यातून बोध घेता येईल.
नेवासे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास ७२४ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर आज सायंकाळी करण्यात आलेल्या दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर मंदिर उजळून निघाले.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिरातील 'पैस' खांबाचे विधिवत पूजन श्री क्षेत्र देवगड दत्त देवस्थान चे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज, ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख, सुनिलगिरी महाराज, विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग, सतीश यांच्या हस्ते झाले. 'पैस' खांबास पहिला दीप अर्पण करून संजीवन सोहळ्यानिमित्त अभिवादन करण्यात आले.
हेही वाचा - आमदार बबनराव पाचपुते यांना कोरोनाबाधा
यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी ग्रामगीतेच पालन करा त्यातून गाव, जिल्हा, राज्य, व साधुसंत, सामाजिक, राजकीय व्यक्तिमत्व कसे असावेत याचा त्यातून बोध घेता येईल, त्यासाठी ग्रामगीतेच पारायण करण्याची गरज आहे. असे आवाहन केले.
दरम्यान उपस्थित संत-महंत व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोत्सव सुरू झाला. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर ७२४ दीप प्रत्येक भाविकांच्या हस्ते लावण्यात आले. दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर व परिसर उजळून निघाला.
यावेळी हभप बाळू महाराज कानडे, रामभाऊ जगताप, जालिंदर गवळी, भैया कावरे , शिवा राजगिरे, डॉ. करणसिह घुले, सुधीर चव्हाण मोहन गायकवाड, पवन गरुड, देविदास साळुंके आदी उपस्थित होते.
अहमदनगर