

Civil Hospital comes under scanner after report exposes large-scale disability certificate irregularities.
Sakal
-समीर दाणी
अहिल्यानगर: ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या फेर वैद्यकीय तपासणीचा गोपनीय अहवाल जिल्हा रुग्णालयाने जिल्हा परिषद सीईओंकडे शुक्रवारी (ता.१६) पाठवला आहे. तब्बल १८३ कर्मचाऱ्यांचा हा अहवाल आहे. यातील काही कर्मचाऱ्यांनी दिव्यांगत्वाच्या प्रमाणात हेराफेरी केल्याचे आढळले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर निलंबनाचे गंडांतर येऊ शकते.