दिव्यांगांना मिळणार स्वतंत्र शिधापत्रिका

गौरव साळुंके
Sunday, 3 January 2021

त्याचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग बांधवांनी तालुक्‍याच्या पुरवठा विभागात नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करावा, असे आवाहन प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले. 

राहुरी : दिव्यांग व्यक्ती कुटुंबासोबत राहतात. त्यांचे नाव शिधापत्रिकामध्ये असते. परंतु, त्यांना अन्नधान्य मिळत नाही. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग बांधवांनी तालुक्‍याच्या पुरवठा विभागात नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करावा, असे आवाहन प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले. 

हेही वाचा - सोनईत पेटणार गडाख विरूद्ध गडाख संघर्ष

घाडगे म्हणाले, की "राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र शिधापत्रिका हवी आहे. त्यांनी नवीन शिधापत्रिकासाठी संबंधित शिधापत्रिका कार्यालयाकडे अर्ज करावा.

अर्ज प्राप्त झाल्यानंतर शासनाने निश्‍चित केलेल्या निकषांच्या अंतर्गत पात्र दिव्यांग व्यक्तींना नवीन शिधापत्रिका व त्यानुसार पत्रिकेवर असणारे लाभ तात्काळ देण्यात यावेत, असे परिपत्रक अन्न व नागरी पुरवठा विभागाने गेल्या काही आठवड्यात काढले आहे. 

"दिव्यांग व्यक्ती कुटुंबासोबत एकत्र राहतात. त्यांची नावे शिधापत्रिकेत नमूद असूनही त्यांना शासकिय कोणत्याच योजनेचा लाभ घेता येत नाही. बहुसंख्य दिव्यांग बेरोजगार आहेत. त्यामुळे होतकरू दिव्यांग बांधवांना विनाअट स्वतंत्र शिधापत्रिका मिळाली पाहिजे. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The disabled will get a separate ration card