Ahilyanagar Rain update: 'नऊ तालुक्यांवर आभाळ कोसळले'; अहिल्यानगर जिल्ह्यात ८४ मंडलात अतिवृष्‍टी, हेलिकॉप्टरने बचावकार्य

Ahilyanagar Under Water: शेकडो गावांना नद्यांनी वेढलेय, लोकांना हेलीकॉप्टरने बाहेर काढले. राज्य मार्गासह महामार्ग ठप्प झाले. नदीकाठच्या गावांचे स्थलांतर करावे लागले. तब्बल सहाजणांचा बळी गेला. शेतशिवार पाण्यात गेले, गायी-गुरे वाहून गेले. गेल्या आठ दिवसांपासून पावसाच्या थैमानाने बळीराजा पिकासारखाच उन्मळून पडलाय.
Helicopter rescue teams evacuating stranded villagers after torrential rains in nine talukas of Ahilyanagar.

Helicopter rescue teams evacuating stranded villagers after torrential rains in nine talukas of Ahilyanagar.

Sakal

Updated on

अहिल्यानगर: नवरात्रौत्सवात पावसाने रुद्रावतार धारण केला आहे. पाचव्या माळेची रात्र अक्षरशः काळरात्र ठरली. वर्षभराचा पाऊस एका रात्रीत कोसळला. तब्बल ८४ मंडळात अतिवृष्टी झाली. परिणामी तब्बल आठ नद्यांना महापूर आलाय. शेकडो गावांना नद्यांनी वेढलेय, लोकांना हेलीकॉप्टरने बाहेर काढले. राज्य मार्गासह महामार्ग ठप्प झाले. नदीकाठच्या गावांचे स्थलांतर करावे लागले. तब्बल सहाजणांचा बळी गेला. शेतशिवार पाण्यात गेले, गायी-गुरे वाहून गेले. गेल्या आठ दिवसांपासून पावसाच्या थैमानाने बळीराजा पिकासारखाच उन्मळून पडलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com