ऊस पेटून देण्याचे आंदोलन किती खरे, किती खोटे? शिवसेना-भाजपमध्ये रंगला कलगीतुरा

Discussions have started about the agitation in Sonai taluka due to lack of sugarcane and registration
Discussions have started about the agitation in Sonai taluka due to lack of sugarcane and registration

सोनई (अहमदनगर) : सोनई येथील मुळा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सध्या ऊसाची नोंद आणि तोडीच्या विषयावरुन शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यात कलगीतुरा रंगला आहे. ऊस पेटून देण्याचे आंदोलन किती खरे व किती खोटे यावर शीतयुध्द सुरु झाले आहे.

मागील महिन्यात करजगाव येथील अशोक टेमक या शेतक-यांने मुळा कारखाना ऊसाची नोंद घेत नाही व तोडही देत नाही म्हणून अडीच एकर ऊसाचे पीक पेटून दिले होते. येथून दोन गटात सुरु झालेला कलगीतुरा आजही सुरुच आहे. गुरुवारी (ता.४) रोजी हनुमानवाडी शिवारात ॠषीकेश शेटे यांनी दीड एकर ऊसाचे पीक पेटवून दिले. महाविकास आघाडी सरकार व संबंधित मंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला.

करजगाव येथे दोन एकर ऊसाला भरपूर पाणी देवून केवळ २० गुंठे ऊसाचे पीक पेटवून दिले तर शेटे यांनी निम्याहून अधिक मधला ऊस अधिच तोडून नगरला चा-यासाठी विकल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्ते करत आहेत. पुरावा म्हणून त्यांनी छायाचित्र व व्हिडिओ सोशलमिडीयावर टाकला आहे. आंदोलक शेतक-यांनी लगेचच खुलासा करत अंगावर आलेली बाजू सावरण्याचा प्रकार विरोधक असल्याचे सांगितले. 

ऊसतोड व नोंद न घेण्याच्या कारणावरुन सुरु झालेल्या आंदोलनाची चर्चा तालुक्यात आहे. कार्यक्षेत्रात यंदा चौदा लाख मे.टन ऊस असून आतापर्यंत नऊ लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. उन्हाची तीव्रता वाढून पाणी कमी पडू लागल्याने ऊसतोडीसाठी सर्वच शेतकरी प्रतिक्षेत आहे. यातच ऊसाचे पीक पेटवून आंदोलन सुरु झाल्याने घरा-दारात तेवढीच चर्चा ऐकण्यास मिळत आहे. मंत्री गडाख या प्रश्नात गुंतवून न पडता रस्ते आणि वीजेच्या प्रश्नासाठी अधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com