Dispute between district administration-MP Vikhe Patil
Dispute between district administration-MP Vikhe Patil

नगर जिल्हा प्रशासन-खासदार विखे पाटलांमधील बेबनाव गेला आरोग्य मंत्रालयात

नगर : जिल्हा प्रशासन व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यातील बेबनाव आता थेट राष्ट्रीय पातळीवर गेला आहे. खासदार विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासन विश्वासात घेत नसल्याबाबत अनेकदा जाहीर वक्तव्य केले होते. आगतिक होत त्यांनी राजीनामा देण्याचीही भाषा केली. यावर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आमच्यात कोणतेच मतभेद नसल्याचे माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केले होते.

जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे. कोणाला कोणापासून बाधा झाली आहे, हे शोधून काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे लॉकडाउन करण्याची गरज असल्याचे मत खासदार विखे पाटील सातत्याने मांडत असतात. परंतु जिल्हा प्रशासन आणि शासन कोणतीच भूमिका घेताना दिसत नाही.

नॅशनल हेल्थ मिशनकडून कोविडसाठी 18 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, या कामात खासदार म्हणून विश्वासात घेतले जात नाही, असे सुजय यांचे म्हणणे आहे. नॅशनल हेल्थ मिशन व केंद्रीय आरोग्य मंत्रालय अंतर्गत असलेल्या आरोग्य समितीकडे विखे पाटील यांनी तक्रार केली आहे. 

मी काही घरचे काम करण्यासाठी खासदार झालेलो नाही. माझा उद्देशच सफल होत नसेल तर काय करणार. बहुतेक मी काही सूचना मांडल्या असतील तर त्याची आजिबात अंमलबजावणी करू नका, असे कोणी सांगत असावे, असाही संशय सुजय विखे पाटील यांनी माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केला.

सध्या नगरमध्ये किती रूग्ण सापडत आहेत, याचा विचार करण्याची गरज आहे. लॉकडाउन केले तर निश्चितच व्यावसायावर परिणाम होईल. परंतु केवळ काही दिवस कडक लॉकडाउन केले असते तर इतक्या मोठ्या प्रमाणात  लोकांना कोरोनाची लागण झाली नसती, असेही सुजय विखे पाटील म्हणाले.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com