
कोपरगाव : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या वादातून पाच जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना कोकमठाण येथे शनिवारी (ता. १०) घडली. साईनाथ गोरक्षनाथ काकड (वय २४, रा. डोऱ्हाळ, राहाता) असे या मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींनी साईनाथ याला मारहाण करून त्याला विष पाजले असल्याचा आरोप साईनाथच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.