भाजपमध्ये पदाधिकारी निवडीमुळे नाराजी; सक्रिय कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले नसल्याचा आरोप

गौरव साळुंके
Friday, 2 October 2020

श्रीरामपूर येथील भाजपाच्या दोन्ही मंडलाचे मंडलाध्यक्ष निवडताना बुथप्रमुख आणि शक्ती प्रमुखांना विश्वासात घेतले नाही. सक्रिय कार्यकर्त्यांच्या मनाविरुद्ध निवडी झाल्या आहेत.

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील भाजपाच्या दोन्ही मंडलाचे मंडलाध्यक्ष निवडताना बुथप्रमुख आणि शक्ती प्रमुखांना विश्वासात घेतले नाही. सक्रिय कार्यकर्त्यांच्या मनाविरुद्ध निवडी झाल्या आहेत. सदर निवडी पक्षाच्या नियमांप्रमाणे झाल्या नसल्याने श्रीरामपूर भाजपा पदाधिकारी निवडीचा येथील भाजपा युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस सचिन ढोबळे, युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष बाळासाहेब हिवराळे, सोमनाथ कदम यांनी निषेध केला आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतेच प्रसिद्धी पत्रक काढले आहे. 

हेही वाचा : मंत्री गडाख यांचे शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
गेल्या पाच वर्षापासुन मेहनत करुन पक्षाचे अनेक कामे मार्गी लावली. पक्षाला तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी काम करणारया कार्यकर्यांमध्ये नाराजी असल्याचे हिवराळे यांनी सांगितले. पुर्वी तालुकाध्यक्ष असलेल्या व्यक्तीलाच पुन्हा संधी मिळाल्याने संघटनामध्ये असंतोष आहे. 

श्रीरामपूर मंडल अध्यक्षांच्या निवडी पक्षाच्या घटनेप्रमाणे सर्व बुथ प्रमुखांना विचारुन व निवड प्रक्रिया राबविणे गरजेचे होते. तसे न झाल्याने मंडल अध्यक्षांच्या निवडी नियमबाह्य असुन तळागाळात काम करणारया बुथप्रमुख व शक्ती केंद्रप्रमुखांना मान्य नसल्याचे ढोबळे यांनी सांगितले. त्यामुळे पुढील दिशा ठरविण्यासाठी लवकरच बुथप्रमुखांची व शक्ती केंद्रप्रमुखांची बैठक घेणार असल्याचे ढोबळे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dissatisfied with the election of office bearers in BJP in Shrirampur taluka