मंत्री गडाख यांचे शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सुनिल गर्जे
Friday, 2 October 2020

कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य अनुदान देण्यात येणार आहे.

नेवासे : कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य अनुदान देण्यात येणार आहे. त्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली असून तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांनी शासनाच्या संबंधीत संकेस्थळावर अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले आहे. 

शासनाच्या शेतकरी हिताच्या ठरणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेची माहिती जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्येंत जावी त्याचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा यासाठी मंत्री गडाख या योजनेबाबत पत्रकारांना माहिती सांगतांना बोलत होते. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मंत्री गडाख म्हणाले, "राज्य शासनाने चालू वर्षीही कृषी यांत्रिकीकरण उप अभियान राबविण्याचे ठरविले असून या अभियानाचे अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिलेली असून या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य अनुदान देण्यात येणार आहे. 
त्यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून शासनाच्या 'महा डीबीटी महा आयटीआय' या संकेतस्थळावर तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत. नेवासे तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून अनुदानावर आधारित या योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन मंत्री गडाख यांनी केले आहे.

हेही वाचा : काँग्रेसकडून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
या अवजारांची करता येणार नोंदणी

कृषी यांत्रिकी करण अभियान अंतर्गत ट्रॅक्‍टर व ट्रॅक्‍टरचलित अवजारांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुदान मर्यादा राहणार असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे ट्रॅक्टर, रोटावेटर, पावर टिलर, पेरणी यंत्र, कल्टीवेटर, ट्रॅक्टर फवारणी यंत्र, मळणी यंत्र, मोगडा, पाचट कुट्टी, रिपर बाईंडर, मल्चर आदी अवजारांची नोंदणी शेतकऱ्यांना करता येणार असल्याची माहिती मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Gadakh appeals to farmers to avail agricultural mechanization schemes