शेतमजूर संघटनेकडून श्रीरामपूर तालुक्यात गरजुंसाठी सायकलचे वाटप

गौरव साळुंके
Monday, 5 October 2020

कामगार नेते भि. र. बावके यांनी प्रतिकुल परिस्थितीत मोठ्या संघर्षातून कामगारांच्या हितासाठी लढे उभारले.

श्रीरामपूर (अहमदनगर) : कामगार नेते भि. र. बावके यांनी प्रतिकुल परिस्थितीत मोठ्या संघर्षातून कामगारांच्या हितासाठी लढे उभारले. रस्त्यावरच्या लढ्याबरोबरच कायदेशीर लढेही दीर्घकाळ देवून त्यांनी कामगारांना न्याय मिळवून दिला. कामगार कायद्याचे ते दांडगे अभ्यासक होते. कामगार क्षेत्रात वकीलीच्या वाटचालीत बावके यांचा मोलाचा वाटा आहे. पुढील काळात कामगारांसमोरील आव्हाने पेलण्यासाठी बावके यांचे कसब आपल्याला अंगी कारावे लागणार असल्याचे आव्हान अॅड के. वाय. मोदगेकर यांनी केले. 

कामगार नेते भि. र. बावके यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा शेतमजूर संघटनेच्यावतीने श्रीरामपूरसह राहुरी तालुक्यातील शेतमजुरांच्या गरजू विद्यार्थ्यांसह दिव्यागांना सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड मोदगेकर, संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब सुरुडे, तुकाराम भुसारी, अॅड. गौरव मोदगेकर उपस्थित होते.

प्रारंभी संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब सुरुडे यांनी भि. र. बावके यांच्या कामगार चळवळीतील संघर्षमय वाटचालीची माहिती दिली. केंद्र सरकारने आणलेल्या कामगार व शेतकरी विरोधी कायद्यामुळे श्रमिक जनतेसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली असुन, अशावेळी बावके यांची विशेष आठवण येते. बावके यांच्या विचारांवरच पक्ष व संघटनेचे कार्य पुढेही जोमाने सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी प्रा. बाळासाहेब बावके, मदिना शेख, जीवन सुरुडे यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकृष्ण बडाख यांनी सुत्रसंचालन केले. तर संघटनेचे अध्यक्ष गुजाबा लकडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुकाराम भुसारी, चिमा शेंडे, दादा पटारे, उत्तम माळी, प्रकाश भांड, राहुल दाभाडे यांनी परिश्रम घेतले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of bicycles by Agricultural Workers Union in Shrirampur taluka