esakal | मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली गरजु नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देणार
sakal

बोलून बातमी शोधा

Distribution of bicycles by Udayan Gadakh in Newase taluka

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या माध्यमातून नेवासे तालुक्यातील सर्व सामान्य, उपेक्षित व वंचित घटकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे उदयन गडाख यांनी सांगितले.

मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली गरजु नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देणार

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या माध्यमातून नेवासे तालुक्यातील सर्व सामान्य, उपेक्षित व वंचित घटकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे उदयन गडाख यांनी सांगितले. 

नेवासे पंचायत समितीच्या समाजकल्याण व शिक्षण विभागाच्या वतीने गरजू व दिव्यांग विद्यार्थ्यांसह लाभार्थ्यांना उदयन गडाख यांच्या हस्ते विविध साहित्यांचे वाटप झाले. सभापती रावसाहेब कांगुणे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, विक्रम चौधरी, रविंद्र शेरकर, सतीश पिंपळे,  गटविकास अधिकारी शेखर शेलार, जिल्हा समाजकल्याण विभागाचे निरीक्षक बाबासाहेब देव्हारे, गट शिक्षणाधिकारी सुलोचना पटारे उपस्थित होते.

गडाख म्हणाले, गोरगरीब गरजूंना लाभ देण्यासाठी पंचायत समितीमधील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या समन्वयातून काम करावे. उपेक्षित घटकांना विविध योजनांचा लाभ देण्याचा माझा प्रयत्न राहील. 

सुलोचना पटारे म्हणाल्या, तालुक्यात ३६१ शाळांमधून ४४४ विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने सर्वेक्षण करून सायकलसह २१ प्रकारचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

बाबासाहेब देव्हारे म्हणाले, समाजकल्याण मार्फत जिल्हयाला दोन कोटीचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले असून यामध्ये नेवासे तालुक्यात ५३ लाभार्थ्यांना टपऱ्या देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेबद्दल डॉ. रेवणनाथ पवार यांचा उदयन गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संपादन : अशोक मुरुमकर