
Dr. Pankaj Ashiya reviews women safety schemes at the District Collectorate, urging effective implementation of the Women Protection Law.
Sakal
अहिल्यानगर: कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. कायद्यांतर्गत पीडित महिलांना तक्रार कुठे करावी याची अनेकदा माहिती नसते. महिलांना तक्रार करणे सुलभ व्हावे, यासाठी संबंधित तालुका व जिल्हा संरक्षण अधिकाऱ्यांचे नाव व संपर्क क्रमांक ग्रामपंचायत, पोलिस ठाणे, अंगणवाडी व नागरिकांची वर्दळ असलेल्या सर्व कार्यालयांच्या दर्शनी भागात लावावेत. महिला हेल्पलाईन क्र. १८१ व बालकांसाठी १०९८ बाबत व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.