माेठा बातमी ! 'शाळा बंद ठेवल्यास पगारात हाेणार कपात'; टीईटीविरोधातील मोर्चाबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम..

Teachers protest: शिक्षकांना दिलेल्या नोटीसमध्ये हजेरी नोंद न झाल्यास पगारावर परिणाम होईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शिक्षक मोर्चात सहभागी व्हावे की नियमित शाळा सुरू ठेवावी, याबाबत संभ्रमात आहेत. शिक्षण विभाग सध्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
Teachers confused over the Anti-TET march as authorities issue salary-cut warnings for keeping schools shut.

Teachers confused over the Anti-TET march as authorities issue salary-cut warnings for keeping schools shut.

Sakal

Updated on

अहिल्यानगर: टीईटीविरोधात जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या मोर्चा व शाळा बंद आंदोलनाबाबत जिल्ह्यात एकमत नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यातच माध्यमिक शिक्षक संचालकांनी मोर्चासाठी शाळा बंद ठेवणाऱ्या शिक्षकांचे त्या दिवसाचे वेतन कापण्याचा आदेश दिला आहे. आता ही बिनपगारी रजा किती शिक्षकांना परवडते, हे मोर्चाच्या प्रतिसादानंतरच कळेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com