Ahmednagar News : गावी जा, पण घरही सांभाळा! कोतवाली पोलिसांचे आवाहन

दिवाळी सण आणि गावातील यात्रेच्या निमित्ताने शहरातील बहुतांश चाकरमाने लोक गावी जातात. परंतु याच संधीचा फायदा घेत चोरटे घर साफ करतात.
Crime
CrimeSakal

अहमदनगर - दिवाळी सण आणि गावातील यात्रेच्या निमित्ताने शहरातील बहुतांश चाकरमाने लोक गावी जातात. परंतु याच संधीचा फायदा घेत चोरटे घर साफ करतात. त्यासाठी गावी जाताना घरांना मजबूत कुलूप आणि सेफ्टी यंत्रणा बसवा, मौल्यवान दागिने रोख रक्कम बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा, असे आवाहन कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

यादव म्हणाले, की अनेक जण दिवाळी सणासाठी अथवा अन्य कारणासाठी गावी जाताना सोशल मीडियावर स्टेटस् ठेवतात. परंतु हीच सवय अनेकांच्या अंगलट येते. चोरटे सोशल मीडियावर लक्ष ठेवून असतात. तुमचे स्टेटस् पाहून तुमच्या घरात कोणी नाही याची त्यांना खात्री होते. यामुळे तुमच्या घरी चोरी होऊ शकते. त्यासाठी सोशल मीडियावर स्टेटस् ठेवताना, स्टोरी बनवताना काळजी घ्या.

गावी जाताना मौल्यवान वस्तू, दागिने, तसेच पैसे घरात ठेवणे टाळा. मौल्यवान वस्तू, पैसे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा. घराला चांगल्या प्रतीचे कुलूप, दरवाजे बसवा. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवा. अनेक घटनांमध्ये चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील चोरून नेतात. यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद होऊनही उपयोग होत नाही. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर सुरक्षित ठिकाणी ठेवा.

संशयितांची पोलिसांना माहिती द्या, घर सोसायटीच्या परिसरात संशयित हालचाली दिसल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. अनेक घटनांमध्ये चोरटे सुरुवातीला घरांची, परिसराची रेकी करतात आणि संधी साधून घरफोडी, चोरी करतात. त्यामुळे संशयित व्यक्तींची माहिती पोलिसांना दिल्यास हा धोका टाळता येत असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.

सुरक्षारक्षकांचे व्हेरिफिकेशन करा

घर, सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक ठेवा. सुरक्षारक्षकाचे पोलिस व्हेरिफिकेशन करून घ्या. घर, सोसायटीच्या परिसरात रात्रीच्या वेळी पुरेसा उजेड राहील, याचीही दक्षता घ्या. अंधाराचा फायदा घेऊन चोरटे त्यांचे काम करतात. त्यांना ही संधी देऊ नका. घराला कुलूप लावून गावी गेल्यानंतर आठवड्या, दोन आठवड्याने घरी येणार असाल, तर सोसायटीमध्ये शेजारी ज्या घरात लोक असणार आहेत, त्यांना फोन करून चौकशी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com