esakal | मोलमजुरी करणा-या गरीब महिलेला सोनईतील डाॅक्टराने दिली मोफत दृष्टी

बोलून बातमी शोधा

A doctor in Sonai has given free vision to a poor working woman.jpg}

हृदयाला रक्तपुरवठा कमी व दम्याचा आजार असल्याने शस्त्रक्रिया करणे अवघड असल्याचे सांगण्यात आले. खर्च अधिक सांगितल्याने सायराने घरात राहणेच पसंत केले. कुटुंबाची अवस्था लंगडी झाल्याने सर्व परिवारात चिंता होती.

ahmednagar
मोलमजुरी करणा-या गरीब महिलेला सोनईतील डाॅक्टराने दिली मोफत दृष्टी
sakal_logo
By
विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाल्याने मोलमजुरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करणा-या महिलेचा संसार अंधारमय झाला होता. त्यावेळी सोनईतील एका डाॅक्टराने स्वखर्चातून ही अंधारवाट प्रकाशमय करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

महिलेचा विनयभंग केल्यामुळे डॉक्‍टरला अटक

शनिशिंगणापूर जवळील दरवेसीनगर परिसरात निजाम शेख एका तुटक्या-फुटक्या झोपडीत राहतात. त्यांना दोन मुलगे व पाच मुली आहेत. मोलमजुरी व गवत-काडी घेवून चार मुली व एका मुलाचे लग्न केले. संघर्ष पाचवीलाच पुजल्याप्रमाणे पती, पत्नीचे कष्ट सुरुच असताना पत्नी सायराची दृष्टी गेली आणि त्या पूर्ण अंध झाल्या. संपूर्ण कुटुंब काळजीत पडलं. दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाल्याने दृष्टी गेल्याचे नगरच्या डाॅक्टरानी सांगितले. हृदयाला रक्तपुरवठा कमी व दम्याचा आजार असल्याने शस्त्रक्रिया करणे अवघड असल्याचे सांगण्यात आले. खर्च अधिक सांगितल्याने सायराने घरात राहणेच पसंत केले. कुटुंबाची अवस्था लंगडी झाल्याने सर्व परिवारात चिंता होती.

पैशांच्या वादातून चौकातच तरुणाचा खून

शेख कुटुंबाची अडचण सामाजिक कार्यकर्ते डाॅ.बाबासाहेब शिरसाठ यांना समजल्यानंतर त्यांनी सर्व जबाबदारी व खर्चाची बाजू संभाळत सायरा शेख
यांच्या एका डोळ्याची शस्त्रक्रिया राहुरी येथील नेत्रतज्ञ डाॅ.संदीप निमसे यांच्याकडून केली. निमसे यांनी अतिशय कमी खर्चात शस्त्रक्रिया केली. आता
सायरा हिस दिसायला लागले असून पंधरा दिवसाने दुस-या डोळ्याची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. 

डाॅ.शिरसाठ यांनी संपूर्ण कोरोना लाॅकडाऊन काळात मोरयाचिचोंरे, कात्रड, लोहगाव, धनगरवाडी, चेडगाव येथे जाऊन अल्पदरात तर गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा दिली. त्यांनी 'रुग्णवाहिका आपल्या दारात' च्या माध्यमातून गरजूंना मोफत सेवा दिली. त्यांची पत्नी व दोन्ही मुले याचक्षेत्रात आहेत. त्यांच्या सेवाकार्यातून एका महिलेचा संसार नव्या दृष्टीने फुलला आहे. परिसरातून डाॅ.शिरसाठ व परीवाराचे कौतुक होत आहे.