आम्हाला दम देऊ नका... डॉ. सुजय विखे पाटलांनी कोणाला सुनावले

Don't give us breath, Dr. Sujay Vikhe Patil told the District Collector
Don't give us breath, Dr. Sujay Vikhe Patil told the District Collector

पारनेर : दूध आंदोलनप्रसंगी अधिक गर्दी झाली तर गुन्हे दाखल करा असा आदेश देऊन दुध उत्पादक शेतक-यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे.  मात्र, वेळ पडली तर या पेक्षाही तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहाणार नाही.

दूध उत्पादक शेतक-यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाची परस्थीती हाताळण्यात पालमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यांना जिल्ह्यात साधे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्यांच्याच पक्षाचे आमदार  घेऊ देत नाही अशी खरमरीत टिकाही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

पारनेर तालुक्याचा प्रभारी या नात्याने मी पारनेरमध्ये आलो आहे. दुधउत्पादक शेतकरांना दुधाला प्रती लिटर 30 रूपये भाव मिळाला पाहिजे. वाढीव आलेली वीज बीले माफ करावित ,  शेतक-यांना  खताचा पुरवठा सुरळीत करावा,  दुधभुकटीला किमान 50 रूपये प्तीकिलोचे अनुदान द्यावे अशी मागणी या वेळी विखे यांनी केली. पारनेर येथे आज (ता. 1 )  आंबेडकर चौकात हे दुधप्रश्ना संदर्भात आंदोलन करण्यात आले. 

राज्यसरकार केंद्र सरकारने  अनुदान द्यावे अशी मागणी करत आहे जर राज्यसरकरा केंद्रसरकारवर आवलंबून आहे तर मग  एवढी ओढाताऩ करूण जनतेच्या विरोधात सरकार का स्थापन केले. नाहीतर तुम्ही बाजूला व्हा अशीही मागणी विखे यांनी या वेळी केली.

वळ स्वतःच्या स्वार्थासाठी  तीन पक्षाचे सरकार स्थपण करण्यात आले आहे ते जनतेला मान्य नाही.  त्यामुळे फार काळ हे सरकार टिकणार नाही. याचे उदाहरण पारनेर तालुक्यातील राजकीय घडामोडीने दाखविले आहे. 

आमच्या  मागण्या मान्य झाल्या नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे खासदार विखे या वेळी म्हणाले. 

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.  जिल्ह्यात कोकोरोनाचे रूग्ण वाढत आहेत   तरीही लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला नाही.जिल्ह्यात कोरोनाची स्थीती अतिशय  गंभीर तालुका  दुधसंघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, महिला आघाडीच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात, जिल्हा चिटणीस सुनील थोरात, माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे,  माजी उप नगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेकर, बाळासाहेब नरसाळे ,रामचंद्र मांडगे, आरपीयचे तालुकाध्यक्ष अमित जाधव सुभाष दुधाडे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, सागर मैड, दत्ता पवार, विश्वास रोहकले, बाळासाहेब कळमकर, किरण कोकाटे, अनिल दिवटे, रमेश साबळे ,शरद सरोदे, काका देशमुख, विश्वस रोहकले यांच्यासह मोठ्या संखेने शेतकरी व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

आंदोलनप्रसंगी गर्दी झाली तर गुन्हे दाखल करा असा आदेश देणारे राज्य सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तालुक्यात अनेक उदघाटने विनामास्क व तीही मोठ्या प्रमाणात गर्दी करून केली. त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल करा. आम्हाला दम देऊ नका. आधी मास्क न वापरता फिरणा-या   लोकप्रतिनिधीवर आधी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी विखे यांनी या वेळी केली . या पुढे मी तालुक्यात लक्ष घालणार आहे.  

देशातील पाचशे जिल्हामध्ये नगर जिल्हाचा 11 वा क्रमांक लागतो. कोल्हापूरला तात्काळ लॉकडाऊन होते मात्र नगर मध्ये  होत नाही ही शोकांतिका आहे.   पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना नगर जिलह्यात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही, असेही विखे म्हणाले.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com