
अहिल्यानगर: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मार्केट यार्ड चौकात २७ जुलैला सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात अनावरण होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. पांजरापोळ मैदानावर हा सोहळा पार पडणार असून, त्यासाठी भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा काढून तो आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे.