esakal | जावेद अख्तर यांचे संघाबाबतचे वक्तव्य घृणास्पद; संघ समजून घेण्याची गरज - मंत्री डॉ. कराड
sakal

बोलून बातमी शोधा

jawed akhtar

जावेद अख्तर यांचे संघाबाबतचे वक्तव्य घृणास्पद - डॉ. कराड

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (जि.अहमदनगर) : जावेद अख्तर (jawed akhtar) यांचे संघाबाबतचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानीशी (taliban) केली. त्यांचा मी निषेध करतो. संघातील प्रत्येक जण राष्ट्रीय हितासाठी, राष्ट्रभक्तीसाठी आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी काम करतो. अख्तर यांनी संघ समजून घेण्याची गरज आहे. असा सल्ला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिला.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (dr bhagwat karad) यांनी रविवार (ता. ५) रोजी श्रीक्षेत्र देवगड (ता,नेवासे) येथे श्री दत्त संस्थानला भेट दिली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर डॉ. कराड बोलत होते. डॉ. कराड म्हणाले, "मी मुंडे कुटुंबातील एक घटक आहे. गेल्या तीस वर्षापासून मी मुंडे कुटुंबीय याबरोबर आहे, मी वहिनींचा व गोपीनाथ गडाचा आशीर्वाद घेऊन माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांना बरोबर घेऊन मी काम करत आहे.

हेही वाचा: टोमॅटो, कांदा, बटाटाचे ‘टॉप’चे भाव गडगडले! योजना कागदावरच

दरम्यान मंत्री डॉ. कराड यांनी प्रारंभी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने भगवान दत्तात्रेय, किसनगिरी बाबा समाधीचे बाहेरूनच दर्शन घेतले तसेच गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचा सत्कार करून दर्शन घेतले. यावेळी मनोज चोपडा, कल्याण दांगोडे, किशोर धनायत, गोपिनाथ वाघ, भीमाशंकर नावंदे, दत्ता शिंदे, आदिनाथ पटारे, अंकुश काळे उपस्थिती होते. यावेळी औरंगाबाद भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, प्रसिद्ध गायक बजरंग विधाते, राम विधाते, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, महेंद्र फलटणे, मोहन आहेर, बाळासाहेब महाराज कानडे, व्यवस्थापक चांगदेव साबळे उपस्थित होते.गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी त्यांचे स्वागत करत सत्कार केला.

हेही वाचा: अहमदनगर : एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

डॉ. कराड विश्वास सार्थ ठरवतील : भास्करगिरी महाराज

जनतेप्रती समाजसेवेची असलेली निष्ठा ही केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांची जमेची बाब होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास डॉ. कराड सार्थ ठरवतील. डॉ. कराड यांच्या माध्यमातून नगर जिल्हा व औरंगाबाद जिल्ह्याचा विकास होणारच आहे. मात्र त्यांना आता संपूर्ण देशभरात काम करायचे आहे. तुमच्या देशकार्यात आमचा पाठिंबा असेल. आजचा दिवस उद्या नसेल हे पंतप्रधान मोदी जाणून आहेत. म्हणून मोदी जे बोलतील ते देशहिताचेच बोलतात, करतात ते राष्ट्रहिताचेच करतात. असे प्रतिपादन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले.

loading image
go to top