गरिबांचा डॉक्टरच कोरोनाने नेला, खर्डा परिसरात शोककळा

डॉ. प्रवीण पाटील
डॉ. प्रवीण पाटीलई सकाळ

जामखेड: संपूर्ण आयुष्य "मोफत आणि माफक" आरोग्य सेवेसाठी त्यांनी वेचले. मात्र, रूग्णांपासून झालेला कोरोना संसर्ग त्यांच्या जीवावर बेतला. दुसऱ्याचे जीव वाचविताना शेवटी स्वतःचा जीव गमावून बसले. त्यांच्या मृत्यूच्या धक्क्याने मातोश्रीनेही रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. परिसरातील "आरोग्यदूत" काळाच्या पडद्याआड गेला.

जातेगाव (ता. जामखेड) येथे गेली सतरा वर्षापासून 'माफक आणि मोफत ' पैसा असो अथवा नसो डॉ. प्रवीण पाटील यांच्यापर्यंत पोहचले की हमखास उपचार मिळायचा. (Dr Praveen Patil dies of corona)

डॉ. प्रवीण पाटील
तळेगाव दिघे केंद्राचं "आरोग्य" सुधारणार, मिळाला निधीचा बुस्टर

डॉ. पाटील यांनी या परिसरात आरोग्य सेवेचा मोठा आधारवड निर्माण केला होता. या परिसरातील तब्बल दहा-बारा गाव जातेगावशी जोडलेली. त्यामुळे आपसूकच डॉ. पाटील यांचेही त्या गावांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. त्यांनी शिक्षण प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खर्डा येथे तर वैद्यकीय शिक्षण बीडला पूर्ण केले होते. त्यामुळे या परिसराशी त्यांची ओळख आणि नाळ पूर्वीपासूनच जोडली होती.

शहरी भागात आरोग्य सेवेची संधी खुणावत असताना त्यांनी जातेगाव येथे रुग्णसेवा सुरू करुन जामखेड, भूम आणि पाटोदा या तीन तालुक्याच्या हद्दीवरील नागरिकांची सतरा वर्षे आरोग्यसेवा केली. सेवेदरम्यान डॉ. पाटील यांना संसर्ग झाला. पत्नी आणि आईलाही संसर्ग झाला. पत्नीने मात केली. मात्र, मायलेकरांना कोरोना घेऊन गेला. गरिबांचा डॉक्टर म्हणून प्रवीण पाटील यांची परिसरात ओळख होती.((Dr Praveen Patil dies of corona)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com