pallavi Kanhore
sakal
- राजू नरवडे
संगमनेर - इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न बाळगत पाच वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आंबीखालसा (ता. संगमनेर) येथील पल्लवी दत्तू कान्होरे हिने अखेर यश मिळवले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून मुद्रांक शुल्क अधिकारी, तसेच राज्य कर निरीक्षक या दोन्ही पदांवर निवड झाली आहे.