

Kopargaon Accident:
Sakal
कोपरगाव : येसगाव शिवारातील भास्कर वस्तीजवळ मनमाड महामार्गावर मध्यरात्री आराम बस व चारचाकीची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात चारचाकीने पेट घेतल्याने चालकाचा जळून मृत्यू झाला. चालक मुजाईद पप्पू शेख यांचा मृत्यू झाला. आराम बसबधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.