

Sangamner police seize narcotic medicines worth ₹2.23 lakh during a raid; case registered under NDPS Act.
Sakal
संगमनेर: शहरातील लालबहादूर शास्त्री चौकातील एम. आर. व्हिटॅमिन सप्लिमेंट या दुकानात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी लागणारी औषधे अवैधरित्या विकली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी मंगळवारी (ता. २८) दुपारी साडेतीनच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख २३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.