A drunk teacher’s car crushed two pedestrians in Akole; one person died, another seriously injured.
Sakal
अहिल्यानगर
Akole Accident:'मद्यधुंद शिक्षकाच्या भरधाव मोटारीने दोन पादचाऱ्यांना चिरडले'; अकोलेत एकाचा मृत्यू, दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक
Ahmednagar district: शिक्षक श्रीकांत विष्णू घाणे यास अटक करण्यात आली आहे. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शहराजवळ अकोले- देवठाण रोडवर भरधाव वेगाने एक कार आली. मोटार चालकाने विठ्ठल लॉन्स समोर एकाला व विघ्नहर्ता अँग्रोसमोर दुसऱ्याला उडवले. यातील दिलीप लक्ष्मण घुले यांचा मृत्यू झाला.
अकोले: मद्यधुंद शिक्षकाच्या भरधाव मोटारीने दोन पादचाऱ्यांना चिरडले. ही हिट अँड रनची घटना अकोले शहराजवळ घडली. दिलीप लक्ष्मण घुले (वय ५८, रा. अकोले) याचा मृत्यू झाला. राजेंद्र लिंबा डोके (रा. खानापूर) जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

