

Bhusari family from Sonaich with their organic banana produce exported to Dubai.
Sakal
-विनायक दरंदले
सोनई : सोनई येथील भुसारी परिवारातील दोघा भावांनी पारंपरिक पीक घेण्याची पद्धत हद्दपार करीत सेंद्रिय शेती करण्याचा घेतलेला निर्णय आर्थिकस्तर उंचावणारा ठरला आहे. त्यांनी नऊ एकरांत लागवड केलेली केळी अगोदर इराण देशात, तर आता दुबई देशात निर्यात झाली आहे. गोड आणि मधुर केळीने सातासमुद्रापार झेप घेतल्याने भुसारी या कष्टकरी शेतकरी परिवाराचे तालुक्यात कौतुक होत आहे.