लिंबाच्या वादामुळे श्रीगोंदेकरांना झाली "बापू-दादां'ची आठवण

Due to the lemon crises Shrigondekar remembered Bapu-Dada
Due to the lemon crises Shrigondekar remembered Bapu-Dada

श्रीगोंदे : लिंबू लिलावाच्या विषयावरुन बाजार समितीने थेट 11 व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले. त्यामुळे व्यापारी, शेतकरी व बाजार समिती, असा संघर्ष उभा राहण्याची भीती आहे. असा संघर्ष यापूर्वीच होण्याची शक्‍यता होती. मात्र, त्यावेळी नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे ती टळली. एकदा ज्येष्ठ नेते दिवंगत शिवाजीराव नागवडे यांनी, तर दुसऱ्या वेळी आमदार बबनराव पाचपुते यांनी व्यापाऱ्यांना समजावून सांगत शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा सल्ला देताना प्रश्‍न जागीच संपविला होता. 

गेल्या काही दिवसांत लिंबाच्या दरावरून श्रीगोंद्यात जोरात वाद सुरू आहे. या सगळ्या गोंधळात अनेकांना आठवण झाली, ती दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या समजूतदारपणाची. 

पहिला प्रसंग 

व्यापारी व शेतकऱ्यांत संघर्ष पेटला होता. भुसार मालाच्या वजनात व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत असल्याने लिलाव बंद पाडले. रस्त्याने जाणाऱ्या बापूंना ही बाब समजली. त्यांनी चालकाला बाजार समितीत मोटार घ्यायला सांगितली. बापूंचे वलय एवढे होते, की ते आल्याचे समजल्यावर आता न्याय मिळेल, या आशेने शेतकरी गर्दीने त्यांच्याभोवती जमा झाले. शेतकऱ्यांवर कशा प्रकारे अन्याय होत आहे, हे सांगू लागले. 

..आणि वजनकपात बंद झाली 

तत्कालीन सभापती बाबासाहेब इथापे ही आठवण सांगताना म्हणाले, ""बापूंनी शेतकरी व व्यापाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांच्यात तेथेच समन्वय घडवून आणला. शेतकरी जगला, तरच सगळे सुरळीत राहिल, तुमचा नफा काढा, मात्र शेतकऱ्यांना कष्टाचे पैसे द्या, असे सांगताच प्रश्न जागीच मिटला आणि वजन कपात बंद झाली.'' 

पाचपुते यांच्यामुळे वाद मिटला 

दर पडल्याने शेतकऱ्यांनी असेच एकदा कांदालिलाव बंद पाडले. त्यावेळी आमदार पाचपुते यांनी समितीत धाव घेतली. पाचपुते यांचा त्या वेळी शब्द प्रमाण होते. त्यांनी एकत्रित चर्चा घडवून आणली. शेतकऱ्यांशी प्रामाणिक वागा, एक दिवस जास्त दर दिला, तर त्यांना घामाचे दाम मिळेल आणि भविष्यात शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांवरचा विश्वास वाढेल, असे सांगताच कांदालिलाव सुरळीत झाले. या प्रसंगाची आठवण तत्कालीन सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी करून दिली. 

पाचपुते यांनी प्रश्‍न सोडवावा 

लिंबू दरावरून पेटलेल्या संघर्षामुळे दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप यांच्यासह आमदार बबनराव पाचपुते यांची आठवण येते. या तिघांच्या शब्दांना सगळेच अंतिम मानत. बापू व तात्या गेले मात्र, आता बबनराव यांच्या शब्दांना सगळ्यांनी मान देऊन लिंबाचा विषय समन्वयाने सोडवावा. राजकारण करण्याची ही वेळ नाही. 
- बाळासाहेब नाहाटा, संचालक, बाजार समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com