esakal | सुखी संसाराला जुन्या प्रेमाचे ग्रहण! माहेर-सासरचे दरवाजे कायमचे बंद
sakal

बोलून बातमी शोधा

mother depression

सुखी संसाराला जुन्या प्रेमाचे ग्रहण! माहेर-सासरचे दरवाजे बंद

sakal_logo
By
गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : दोघेही सुखाने राहत होते. त्यांच्या या सुखी संसारवेलीवर एक कळीही उमलली. त्यामुळे संसार चांगलाच बहरला होता. मात्र, तिच्या जुन्या प्रेमाचे ग्रहण लागले. जुन्या प्रेमासाठी तिने बहरलेल्या संसाराला लाथ मारून जाणे पसंत केले. ही गोष्ट नियतीला मान्य नव्हती. काय घडले नेमके? (due-to-previous-relation-created-problems-in-Marriage-jpd93)

जुन्या प्रेमासाठी तिने घेतला निर्णय पण....

नगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला. सुखाने संसार सुरू होता. त्यांच्या सुखी संसारवेलीवर एक कळीही उमलली होती. जुन्या प्रेमामुळे या सुखी संसारात मिठाचा खडा पडल्याने रंगाचा बेरंग झाला. एके दिवशी घरातील सर्व वैभव नाकारून प्रियकराबरोबर जाण्याचा निर्णय तिने मनाशी ठाम करून, ती एक दिवस घरातून अचानक गायब झाली. सासरच्या मंडळीने ती गायब झाल्याची तक्रार तोफखाना पोलिस ठाण्यात दिली. तोफखाना पोलिसांनी तिचा शोध घेतला. पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर सासरच्या व माहेरच्या लोकांना पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले. मात्र तिला दोन्ही कुटुंबांनी घरात घेण्यास नकार दिला. आपल्याला एक वेळ माफ करून घरात घ्यावे, यासाठी ती सासरच्या व माहेरच्या प्रत्येकाकडे आशेने पाहत होती. आपल्या चुकीचा पश्चात्ताप तिला झाला होता. तिच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंमुळे ते स्पष्ट दिसत होते.

हेही वाचा: आमदार-पोलिस निरीक्षकांत खडाजंगी; बैठक सोडून जाण्याची सूचना

माहेर-सासरचे दरवाजे बंद

तरीही चिडलेल्या नातेवाइकांना मायेचा पाझर फुटला नव्हता. कोणी तरी ‘चल घरी’ असे म्हणेल, म्हणून ती प्रत्येकाकडे आशेने पाहत होती. एकीकडे तिची ही अवस्था असताना, लहान गोंडस मुलगी ओळखीची माणसे दिसल्याने त्यांच्याकडे जाण्यासाठी झेपावत होती; परंतु आईच्या चुकीमुळे त्या निरागस झेपेकडेही नातेवाइकांकडून दुर्लक्ष केले जात होते. आजी-आजोबा घेत नसल्याने चिमुरडीच्या डोळ्यांतून अश्रूंना मिळालेली मोकळी वाट पाहून उपस्थितांनाही गहिवरून येत होते. तिला पोलिसांनी शोधून नगरमध्ये आणले. मात्र, प्रेमाबरोबरच सासर व माहेरच्या लोकांनीही तिला नाकारले.

स्नेहालय संस्थेकडे रवानगी - गडकरी

तोफखाना पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद असलेल्या तक्रारीबाबत तपास करून संबंधित महिलेचा शोध घेण्यात आला. सासर व माहेरच्या नातेवाइकांनी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे स्नेहालय संस्थेत तात्पुरत्या निवाऱ्यासाठी पाठविण्यात आले आहे. - ज्योती गडकरी, पोलिस निरीक्षक, तोफखाना पोलिस ठाणे

हेही वाचा: शनिमंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला अखेर शनिचा प्रकोप

loading image