esakal | शनिअमावस्येला केली शनिमंदिरात चोरी; अखेर चोरट्याला शनिचा प्रकोप
sakal

बोलून बातमी शोधा

thief

शनिमंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला अखेर शनिचा प्रकोप

sakal_logo
By
गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : माळीवाड्यातील शनिमंदिरात शुक्रवारी (ता. ९) शनिअमावस्येच्या दिवशी चोरी झाली होती. चोरट्याने मंदिरातील चांदीचे दागिने व दानपेटी चोरली होती. या मंदिराचे पुजारी दुसऱ्या दिवशी पहाटे पुजा करण्यासाठी आले. त्यावेळेस चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. (thief-arrested-for-Theft-in-shani-temple-marathi-news-jpd93)

शनिअमावस्येला केली शनिमंदिरात चोरी; अखेर चोरट्याला शनिचा प्रकोप

अहमदनगर रेल्वेस्थानक परिसरात देवाचे दागिने विकण्यासाठी तरुण आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विवेक पवार यांच्या पथकाने सावंत यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, दागिने आढळून आले. त्यास विश्‍वासात घेतले असता, त्याने माळीवाड्यातील मंदिरातून हे दागिने चोरल्याची कबुली दिली आहे. शहरातील माळीवाड्यातील शनिमंदिरात चोरी करणारा आरोपी रामदास विष्णू सावंत (वय २१, रा. जांबूत, ता. संगमनेर ) याला कोतवाली पोलिसांनी रविवारी (ता. १८) गजाआड केले. त्याच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत केले आहेत.

हेही वाचा: वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : छिंदमविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

हेही वाचा: आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचे स्वप्न अधुरेच; मायलेकींचा अंत

loading image