Shocking Robbery in Waghapur: एका आजीचा दागिना चोरण्यासाठी दरोडेखोरांनी तिचा कान ओढल्याने तो तुटला. सदर चोरीचा प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. संदीप लांडे, जय औटी, यमुनाबाई औटी, भाऊसाहेब लांडे यांच्या घरांवर हा सशस्त्र दरोडा पडला.
Shocking incident in Waghapur: Robbers drug family, sever elderly woman’s ear, and flee with loot.Sakal
अकोले : अकोले तालुक्यातील वाघापूर येथे दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. पहाटे सुमारे दीड ते दोन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी चार घरांमध्ये घुसत घरातील झोपलेल्या व्यक्तींच्या तोडांवर गुंगीचे औषध असलेल्या कापसाचा बोळा फिरवून पैसे, दागिने लुटले.