
Tremors shake Aklapur and surrounding villages; mild earthquake of 2.9 magnitude reported.
sakal
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील बोटा, घारगाव, अकलापूर आणि परिसरातील गावांना आज दुपारी भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या धक्क्यामुळे घरातील भांडी, डबे पडल्याचे नागरिकांनी सांगितले. या प्रकारामुळे अकलापूर पंचक्रोशीतील गावांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.