शिर्डीच्या इकबाल गुरूजींचे शिक्षण मंत्र्यांनी केलं कौतुक

सतीश वैजापूरकर
Friday, 25 December 2020

"सकाळ'ने राज्यव्यापी प्रसिद्धी दिल्याने, राज्यभरातील शिक्षक, नातेवाईक आणि मित्रांचे अभिनंदनाचे फोन आले. कालचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचा ठरला, अशा शब्दांत शिक्षक अजमत इकबाल यांनी भावना व्यक्त केल्या. 

शिर्डी ः "शिर्डीच्या गुरुजीला "गुगल'चा सलाम' या " ई सकाळ'ध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दखल घेतली. या दोघांनीही "ट्‌वीट' करीत या बातमीचा संदर्भ देताना येथील ऊर्दू शाळेतील शिक्षक अजमत इकबाल यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. 

"सकाळ'ने राज्यव्यापी प्रसिद्धी दिल्याने, राज्यभरातील शिक्षक, नातेवाईक आणि मित्रांचे अभिनंदनाचे फोन आले. कालचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचा ठरला, अशा शब्दांत शिक्षक अजमत इकबाल यांनी भावना व्यक्त केल्या. 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने गुगलच्या सहकार्याने राबविलेला गुगल क्लासरूम प्रकल्प यशस्वी ठरला;याचा गुरुजी अजमत इकबाल हे मूर्तिमंत उदाहरण आहेत. गुगलने अजमत सरांच्या कामगिरीवर बनवलेला माहितीपट इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा मला विश्वास आहे.

शिक्षणमंत्री गायकवाड यांनी "ट्‌वीट'मध्ये म्हटले आहे, की "महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने "गुगल'च्या सहकार्याने राबविलेला "गुगल क्‍लासरूम' प्रकल्प यशस्वी ठरला. गुरुजी अजमत इकबाल हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे.

हेही वाचा - मंत्री गडाख यांच्यामुळे सरली शनिदेवाची राजकीय साडेसाती

"गुगल'ने अजमत सरांच्या कामगिरीवर बनविलेला माहितीपट इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा मला विश्वास आहे.' विखे पाटील ट्‌वीटमध्ये म्हणतात, की "शिर्डी विधानसभा मतदारसंघातील शिक्षक अजमत इकबाल यांनी कोरोना संकटात संधी शोधून विद्यार्थ्यांना केलेल्या ज्ञानदानाचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे.' 

"गुगल ऍप' व "यू-ट्यूब' चॅनेलद्वारे आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना इकबाल यांनी ऑनलाइन पद्धतीने इंग्रजीचे धडे दिले. "गुगल फार्म' ऍपच्या साहाय्याने वेळोवेळी चाचण्या घेतल्या. प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधला. "गुगल'ने राज्य पातळीवर सर्वाधिक चांगले काम करणारे शिक्षक, म्हणून त्यांच्या कार्यावर "गुगल'ने माहितीपट तयार केला. याबाबतची सविस्तर बातमी काल "सकाळ'ने सर्व आवृत्यांत प्रसिद्ध केली. तिची राज्यभर दखल घेण्यात आली. 

शिर्डी ऊर्दू शाळेसाठी आम्ही आजवर आवश्‍यक ते सर्व सहकार्य करीत आलो. या शाळेतील प्राथमिक शिक्षक अजमत इकबाल यांच्या कार्याची "गुगल' व "सकाळ'ने दखल घेतली. एका अर्थाने हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचादेखील बहुमान आहे. 
- शालिनी विखे पाटील, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद 
 
"सकाळ'ने माझ्या धडपडीस राज्यव्यापी प्रसिद्धी दिली. राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. मी याची कल्पनादेखील केली नव्हती. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी "सकाळ'मुळे माझ्या धडपडीची दखल घेतली. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमच्या शाळेला नेहमी सहकार्य लाभते. त्यांनीही माझे अभिनंदन केले. 
- अजमत इकबाल, प्राथमिक शिक्षक, ऊर्दू शाळा, शिर्डी 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Education Minister appreciated Iqbal Guruji of Shirdi