बंदी शाळेचे रूपांतर संधीशाळेत केल्यास अमूलाग्र बदल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

जयहिंद लोकचळवळीतर्फे आयोजित ग्लोबल कॉन्फरन्समधील शिक्षण प्रणाली या परिसंवादात ते बोलत होते. ते म्हणाले, की शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. मात्र, आजही ग्रामीण भागातील अनेक गरीब मुले शिक्षणापासून वंचित आहेत. या सर्वांना बंदी शाळेतून संधी शाळेत आणणे अत्यंत गरजेचे आहे. रोजगाराभिमुख शिक्षणाबरोबर आवड असलेल्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी निर्माण करून देण्यासाठी शासन तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. 

संगमनेर ः जगात परिवर्तन घडवू शकणारे महात्मा गांधींचे शिक्षणविषक कृतिशील व शाश्वत विचार भारतातही मोठे परिवर्तन घडवू शकतात. वंचितांच्या शिक्षणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि बंदीशाळेचे रुपांतर संधी शाळेत केल्यास देशात अमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास ज्येष्ठ संशोधक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ विवेक सावंत यांनी व्यक्त केला. 

जयहिंद लोकचळवळीतर्फे आयोजित ग्लोबल कॉन्फरन्समधील शिक्षण प्रणाली या परिसंवादात ते बोलत होते. ते म्हणाले, की शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. मात्र, आजही ग्रामीण भागातील अनेक गरीब मुले शिक्षणापासून वंचित आहेत. या सर्वांना बंदी शाळेतून संधी शाळेत आणणे अत्यंत गरजेचे आहे. रोजगाराभिमुख शिक्षणाबरोबर आवड असलेल्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी निर्माण करून देण्यासाठी शासन तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. 

डॉ. अजय पोद्दार म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतीसाठी महात्मा गांधींच्या विचारांची प्रभावी अंमलबजावणी भारतात तातडीने होणे गरजेचे आहे. समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याने मूल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देणे गरजेचे आहे. 

आमदार डॉ. तांबे म्हणाले, की सध्या शिक्षणावर अपेक्षित खर्च होत नाही. समाजातील श्रीमंत व गरिब हे दोन स्तर कमी करण्याचे काम शिक्षणामुळे होईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम इंग्रजीचे शिक्षण मिळाले तर ते चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतात. 
डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अजय पोद्दार, भाऊसाहेब चासकर, अग्नेक्षा स्पायनिस्वा (पोलंड), सबरिना चौधरी (बांगलादेश), अरिफ रेहमान (पाकिस्तान), संदीप वाकचौरे, रिशिका राका, पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे आदींनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन संदीप वाकचौरे व उत्कर्षा रुपवते यांनी केले तर संदीप खताळ यांनी आभार मानले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Education will give children better opportunities