नेवाशात आठ दिवस "जनता कर्फ्यू' 

Eight-day "public curfew" in Nevasa
Eight-day "public curfew" in Nevasa

नेवासे : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरात येत्या शनिवारी (ता. 8) सायंकाळी पाच वाजेपासून 16 ऑगस्टपर्यंत "जनता कर्फ्यू' पाळण्यात येणार आहे.

"जनता कर्फ्यू'ची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून "प्रसाद' मिळणार आहे. या काळात फक्त दवाखाने व औषधांची दुकाने सुरू राहणार आहेत. 

नगरपंचायतीच्या प्रांगणात आज उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सतीश पिंपळे, ऍड. काकासाहेब गायके, युवा नेते संजय सुखदान, भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, शहराध्यक्ष मनोज पारखे, निरंजन डहाळे, शिवसेना शहराध्यक्ष नितीन जगताप, विजय गांधी, सूर्यकांत गांधी, इम्रान दारूवाला, असिफ पठाण यांच्या उपस्थितीत बैठक झाली. 

तालुक्‍यात गुरुवारपर्यंत (ता. 6) कोरोनाबाधितांची संख्या 305 झाली असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक 92 रुग्ण एकट्या नेवासे शहरात आढळले आहेत.

पहिल्या लॉकडाउननंतर तहसीलदार रूपेश सुराणा व पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलिस प्रशासनाने खमकी भूमिका घेतल्याने शहरात सुरवातीच्या 103 दिवसांत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. मात्र, त्यानंतर नेवासे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच गेला. त्यामुळे नेवासेकरांनी "जनता कर्फ्यू'चा निर्णय घेतला आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com