

Political Chess in Ahilyanagar: Eknath Shinde Gains Ground by Backing Discontented BJP Members
Sakal
-सतीश वैजापूरकर
शिर्डी: अहिल्यानगर जिल्ह्यातील पालिका निवडणुकीच्या मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभावी भूमिका बजावताना दिसत आहेत. भाजपत कोंडी झालेल्या उमेदवारांना नगराध्यक्षपदाची संधी देऊन त्यांनी नव्याने डाव मांडला आहे. पालिका निवडणुकांचा निकाल काहीही लागो, शिंदे यांच्या या खेळीमुळे जिल्ह्यातील भाजपच्या प्रभावाला तात्पुरता तरी चेकमेट बसला आहे. नाराज भाजपवासीयांमुळे शिंदे यांना पक्ष विस्ताराची संधी मिळाली, ती त्यांनी बरोबर साधली.