
Floodwaters from Vishram Ganga river damage crops, while a wall collapse in Chilekhanwadi claims an elderly man’s life.
Sakal
कुकाणे: नेवासे तालुक्यात मुसळधार पावसाने कुकाणे परिसरात पाचव्यांदा नद्या नाले ओढ्यांना महापूर आले आहेत. शनिवार (ता.२७) रात्रभर कुकाणे परिसरात उच्चांकी पाऊस कोसळल्याने पंचक्रोशीतील नद्यांचे पाणी पुलावरून वाहत असल्याने दहा गावांची वाहतूक खोळंबली होती. चिलेखनवाडीमध्ये पिराजी भीमराव पिटेकर यांचा मृत्यू झाला.