महावितरणचा पाय खोलात; नेवासे तालुक्‍यात वीजबिलाची थकबाकी 30 कोटींवर 

सुनील गर्जे
Wednesday, 25 November 2020

कोरोनाचा कहर सुरू असतानाच नागरिकांना मोठा झटका बसला, तो वाढीव वीजबिलाचा. त्यामुळे अनेकांनी बिले भरली नाहीत.

नेवासे (अहमदनगर) : कोरोनाचा कहर सुरू असतानाच नागरिकांना मोठा झटका बसला, तो वाढीव वीजबिलाचा. त्यामुळे अनेकांनी बिले भरली नाहीत. तालुक्‍यातील अनेकांनी गेल्या एप्रिलपासून वीजबिल न भरल्याने 23 हजार 184 थकबाकीदारांकडे तब्बल 30 कोटी 39 लाख 79 हजारांची थकबाकी झाली आहे. 

कोरोना संकटात सुरवातीला सरासरी बिले दिली गेली. ती अनेकांनी भरलीदेखील; मात्र नंतर आलेले बिल ग्राहकांना "शॉक' देणारे ठरले. महावितरणच्या नेवासे व घोडेगाव विभागात घरगुती, वाणिज्य, औद्यागिक, तसेच शहरातील पथदिवे व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे तब्बल 30 कोटी 39 लाख 79 हजारांची थकबाकी झाली आहे. त्यात नेवासे विभागांतर्गत वरील वर्गवारीनुसार 13 हजार 894 ग्राहकांकडे 22 कोटी 89 लाख 20 हजार, तर घोडेगाव विभागात 9 हजार 290 ग्राहकांकडे 9 कोटी 60 लाख 79 हजार रुपयांची थकबाकी आहे. 

वीजबिल माफी मिळेल, या आशेवर अनेकांनी बिले भरलीच नाहीत. त्यामुळे तब्बल 23 हजार 290 ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी आहे. वीजमीटरची तपासणी न करणे, परस्पर रीडिंग टाकणे, ग्राहकांना वीजबिल वेळेवर न देणे, या गोंधळामुळे बहुतांश ग्राहकांच्या मानगुटीवर हे वाढीव बिलाचे भूत बसले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कृषिपंपांची थकबाकी 299 कोटी 
नेवासे विभागात कृषिपंपांच्या एकूण 18 हजार 727 थकबाकीदारांकडे तब्बल 298 कोटी 94 लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती महावितरणचे नेवासे विभाग उपअभियंता शरद चेचर यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात-आठ महिन्यांपासून वीजबिलाची ग्राहकांकडे मोठी थकबाकी आहे. ग्राहकांकडून महावितरणला सहकार्याची अपेक्षा आहे, असे भाऊसाहेब बडे (उपअभियंता, महावितरण, घोडेगाव विभाग) यांनी सांगितले. 

दृष्टिक्षेपात थकबाकी 
नेवासे विभाग 

वर्गवारी ग्राहक थकबाकी 
घरगुती 11,990 2 कोटी 47 लाख 82 हजार 
वाणिज्य 1318 68 लाख 46 हजार 
औद्योगिक 298 89 लाख 71 हजार 
पथदिवे 126 16 कोटी 53 लाख 
सार्वजनिक पाणीपुरवठा 28 2 कोटी 12 लाख 
सार्वजनिक सेवा 134 9 लाख 21 हजार 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity arrears in Newase taluka over 30 crores