
जुन्नर : आंबे-हातवीज (ता. जुन्नर) येथील कोकण कड्यावरून उडी मारून दोघांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. सध्या श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथे महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत असणाऱ्या व मूळ गाव हातवीज असलेल्या रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) व आंबोली (ता. जुन्नर) येथील रूपाली संतोष खुटान (वय १७), अशी मृतांची नावे आहेत.