

Prof. Ram Shinde offering floral tribute to late Shivajirao Kardile during the all-party condolence meet in Ahmednagar.
Sakal
अहिल्यानगर: जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष तथा आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले यांनी सर्वसामान्यांना नेहमीच आधार दिला. जिल्हा बँकेच्या याच सभागृहात एक महिन्यापूर्वी बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली होती. त्यानंतर आता शोकसभेचे आयोजन करण्याची वेळ आली, ही बाब मनाला खेद देणारी आहे, अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.