अहमदनगर : दोषविरहित मतदार यादीवर भर ;राजेंद्र भोसले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. राजेंद्र भोसले
अहमदनगर : दोषविरहित मतदार यादीवर भर ; राजेंद्र भोसले

अहमदनगर : दोषविरहित मतदार यादीवर भर ; राजेंद्र भोसले

अहमदनगर : जिल्ह्यातील निवडणूक शाखेतील विविध घटकांनी केलेल्या निरंतर जनजागृती व कामामुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३५ लाख ५७ हजारांच्या पुढे गेली आहे. जिल्ह्याची मतदार यादी अधिक दोषविरहीत व सर्व समाज घटकांना सामावून घेणारी व्हावी, यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज (मंगळवार) येथे दिली.

हेही वाचा: शेती उत्पन्न बाजार समितीच्या २९ कर्मचाऱ्यांची सेवा अधांतरीच

राष्ट्रीय मतदार दिनात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार चंद्रशेखर शितोळे, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, शंकर थोडे आदी उपस्थित होते. भोसले म्हणाले, जिल्ह्यात मतदार यादीचा निरंतर पुनरिक्षण कार्यक्रम व नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमामध्ये ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत नव्हती, अशा १८ वर्षे वय पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांची नावे यादीत घेण्यात आली. जिल्ह्यातील सात मतदार नोंदणी अधिकारी, १४ सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि ३७२२ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचा: UP Election : मालेगाव स्फोटातील आरोपीची उमेदवारी 'जदयू'कडून मागे!

जिल्ह्यात मतदार जनजागृती विषयक उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉ. अमोल बागूल यांना, तर उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल पत्रकार महेश देशपांडे यांचा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.

भोसले यांना पुरस्कार जाहीर

या कार्यक्रमापूर्वी औरंगाबाद येथून मुख्य राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या राज्यस्तरीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना नाशिक विभागातील उत्कृष्ट जिल्हा निवडणूक जिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला.