पंचायत समितीच्या आवारात कचऱ्याचे ढीग; स्वच्छतेच्या संदेशाला तिलांजली, अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

पंचायत समितीतील रोजचा कचरा कार्यालयाच्या इमारतीजवळ मागील बाजूस संकलित केला जात असून, तो जाळला जात आहे. यामुळे आगीची घटना घडण्याची शक्‍यता असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

अहमदनगर : स्वच्छतेचा जागर करणाऱ्या नगर पंचायत समितीच्या आवारात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच स्वच्छतेचे धडे देण्याची गरज भासू लागली आहे. भंडाऱ्यातील आगीच्या घटनेनंतर सरकारने फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, नगर पंचायत समिती अजून गाढ झोपेत असल्याचे दिसते. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

भारनियमन झाल्यानंतर सर्व कामकाज विनाअडथळा सुरू राहावे, यासाठी इन्व्हर्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्या बॅटऱ्या ठेवण्यास जागा नसल्यामुळे त्या जिन्याखाली ठेवलेल्या आहेत. मात्र, बॅटऱ्या ठेवताना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्‍यक असतानाही त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. कार्यालयातील मोडकळीला आलेल्या खुर्च्या, टेबल व अडगळीचे साहित्य जिन्याखाली अस्ताव्यस्त ठेवलेले असून, तेथे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्वच्छतेमुळे इमारतीची रया गेली आहे. याच ठिकाणी एक कुंडी ठेवण्यात आली असून, तिचा पिचकदाणी म्हणून वापर केला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पंचायत समितीतील रोजचा कचरा कार्यालयाच्या इमारतीजवळ मागील बाजूस संकलित केला जात असून, तो जाळला जात आहे. यामुळे आगीची घटना घडण्याची शक्‍यता असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

नगर पंचायत समितीत स्वच्छता ठेवण्यात येत असून, काही साहित्य ठेवण्यास जागा नसल्याने ते जिन्याखाली ठेवण्यात आले आहे. आवारात कचरा जाळण्यात येत असेल, तर ते बंद करण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात येईल. 
- सचिन घाडगे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, नगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An empire of uncleanliness has been created in the premises of Nagar Panchayat Samiti in Ahmednagar