
शेवगाव : महसूल खात्यात नोकरीस लावतो, असे आमिष दाखवून दोन तरुणांची दहा लाख ५० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील शिवसेनेच्या पदाधिकारी विद्या भाऊराव गाडेकर त्यांचे वडील भाऊराव भानुदास गाडेकर (दोघे रा. शेवगाव) व श्यामराव विश्वंभर लोकरे (रा. निलंगा, जि. लातूर) यांच्याविरोधात गौतम अर्जुन दौंड (वय ३५, रा. हातराळ, ता. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.