गुड न्यूज : नगरमध्ये "ईएसआयसी'धारकांना 25 रुग्णालयांत मिळणार आरोग्य सेवा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

एमआयडीसीसह विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ईएसआयसी (राज्य कर्मचारी विमा निगम) धारक कामगारांना आता जिल्ह्यातील 25 रुग्णालयांत आरोग्यसेवा मिळणार आहे. ईएसआयसीच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच नगरला उपकार्यालय सुरू होणार असल्याची माहिती मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर यांनी दिली. 

नगर : एमआयडीसीसह विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ईएसआयसी (राज्य कर्मचारी विमा निगम) धारक कामगारांना आता जिल्ह्यातील 25 रुग्णालयांत आरोग्यसेवा मिळणार आहे. ईएसआयसीच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच नगरला उपकार्यालय सुरू होणार असल्याची माहिती मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर यांनी दिली. 

हेही वाचा रेकॉड ब्रेक : नगर जिल्ह्यात दिवसभरात 43 कोरोना रुग्ण 

ईएसआयसीविषयक मिळणाऱ्या सुविधा, त्यावरील मार्गदर्शन व अडचणी सोडविण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथील सभागृहात विशेष चर्चासत्रे होत. परंतु अडचणी सोडविण्यासाठी नाशिकला जावे लागत होते. याबाबत मराठा चेंबर ऑफ कॉमर्समधील एचआर फोरमचे अध्यक्ष राजेश पेवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कामगार व रोजगार मंत्रालय, दिल्ली यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला. नगर जिल्ह्यातील उद्योजकांसाठी जास्तीत जास्त रुग्णालये सामील करण्याबाबत त्यात नमूद केले. 

आवश्‍य वाचा फेरफार नडली : मंडलाधिकारी आव्हाड व तलाठी कैदके निलंबित 

केंद्रीय मंत्रालयाने तत्काळ दाखल घेत राज्य वैद्यकीय अधिकारी-ईएसआयसी विभागास लक्ष देण्यास सांगितले. त्यानुसार जिल्ह्यात ईएसआयसी कार्यालय, रुग्णालयास मंजुरी मिळाली. ईएसआयसीधारकांना जिल्ह्यातील 25 रुग्णालयांत आरोग्यसेवा मिळणार आहे. त्याचा कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांना लाभ होणार आहे. ईएसआयसीच्या सुविधांसाठी उपाध्यक्ष प्रकाश गांधी, प्रदीप बागूल यांनी प्रयत्न केले. 

हेही वाचा क्‍या बात है होमिओपॅथी कोरोनावर ठरतेय असरदार, नगरच्या डॉक्‍टरांचे हे आहेत निष्कर्ष 

खासगी रुग्णालयातही खर्च मिळणार 
ईएसआयसी योजनेत जिल्ह्यातील 20 ते 25 हजार कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळतात. खासगी रुग्णालयात दाखल केल्यास उपचारखर्च ईएसआयसीमार्फत केला जातो. अहमदनगर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ESIC holders treated in 25 hospitals