क्या बात है ः कोरोनावर होमिओपॅथी ठरतेय असरदार...नगरच्या डॉक्टरांचे हे आहेत निष्कर्ष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

आतापर्यंत 19 हजार नागरिकांना प्रतिबंधात्मक औषधे दिली आहेत. तर कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या क्‍वारंटाईन 260 नागरिकांना होमिओपॅथिक औषधे देण्यात आली आहेत.

नगर ः जिल्ह्यातील कोरोना अाटोक्‍यात आणण्यासाठी इंडियन होमिओपॅथिक फोरम (आयएचएफ) संघटनेने जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा आयुष विभाग यांच्या सहकार्याने विशेष मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेला संगमनेरमधील कन्टेन्मेंट झोन भागातील नागरिकांना प्रतिबंधात्मक औषधोपचार व परिणाम या संदर्भात संशोधन करून काही निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. या मोहिमेमुळे कोरोना अाटोक्‍यात आणण्यासाठी चांगलेच यश मिळू लागले अाहे. तसा दावा इंडियन होमिओपॅथिक फोरमचे मुख्य संशोधक डॉ. सोमिनाथ गोपाळघरे यांनी केला आहे.

हेही वाचा - मुलगाच म्हणतो, आईचे अनैतिक संबंध

आयएचएफ संस्थेने ही मोहीम सुरू करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने 12 जूनला परवानगी दिली. संस्थेने 14 जूनपासून कामाला प्रारंभ केला. या मोहिमेत आत्तापर्यंत संगमनेर तालुक्‍यातील निमोण, नाईवाडपुरा, कुरण या भागात प्रतिबंधात्मक होमिओपॅथिक औषधे देण्यात आली.

या भागात आतापर्यंत 19 हजार नागरिकांना प्रतिबंधात्मक औषधे दिली आहेत. तर कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या क्‍वारंटाईन 260 नागरिकांना होमिओपॅथिक औषधे देण्यात आली आहेत. आयएचएफच्या कामामुळे संगमनेरमधील कन्टेन्मेंट झोनमधून कोरोना बाधित रुग्ण प्राप्त होण्याचे प्रमाण पूर्णपणे थांबले आहे.

क्लिक करा - पाथर्डीच्या वारकऱ्याला पांडुरंग पावला

नागरिकांत रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवण्यात होमिओपॅथी यशस्वी ठरत आहे, असे संशोधनातून लक्षात येत आहे. या संदर्भात अभ्यासपूर्ण संशोधन होण्याची व झालेल्या संशोधनानंतर देशात संधोधन होण्याची आवश्‍यकता डॉ. गोपाळघरे यांनी व्यक्‍त केली. 

 

  • उपचार व निरीक्षणातून हे           निष्कर्ष आले हाती 
  • * कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची पूर्ण माहिती घेऊन योग्य होमिओपॅथिक उपचार मिळाले तर कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो.
  •  क्‍वारंटाईन रुग्णांना प्रतिबंधात्मक उपचार दिले तर रोगप्रतिकारक शक्‍ती वाढून मानसिक प्राबल्य वाढते.
  •  कोरोना बाधित रुग्णांना औषधांमुळे येणारा थकवा व नैराश्‍य दूर होण्यास मदत होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Homeopathy is effective on corona