अहमदनगर : इथेनॉलला साखरेची ‘गोडी’

कारखान्यांना केंद्राकडून प्रोत्साहन; पेट्रोलमध्ये वापर वाढणार
Ethanol
Ethanol sakal

अहमदनगर : साखरेच्या दरांमुळे अनेकदा अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना इथेनॉलनिर्मिती संजीवनी ठरत आहे. केंद्र सरकारचे इथेनॉलचा वापर वाढविण्याचे धोरण आहे. विशेषतः वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये आठ ते दहा टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल वापरण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांना निर्मितीबाबत परवाने देण्यात येत आहेत. त्यामुळे कारखान्यांना, म्हणजेच सभासद शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकणार आहे.

Ethanol
कायद्याचा आदर करा नाहीतर दुकान बंद करा; न्यायालयाने ट्विटरला फटकारले

पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात इथेनॉलचा वापर वाढविल्यास या किमती काही अंशी कमी करणे शक्य होईल. त्यासाठीच इथेनॉलचा वापर वाढविण्यास वाहने उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सूचित करण्यात आले आहे. साहजिकच इथेनॉलची मागणी वाढत आहे. सध्या नगर जिल्ह्यात नऊ कारखान्यांमध्ये इथेनॉलनिर्मितीचे प्रकल्प आहेत. इतर कारखान्यांनाही प्रकल्पासाठी केंद्राकडून ५० टक्के कमी व्याजात कर्ज दिले जात आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये राज्य व केंद्राकडून अनुदानही मिळत आहे.

सर्वच साखर कारखान्यांमधून तीन प्रकारचे मोलॅसेस निघतात. त्यामधून इथेनॉलची निर्मिती होते. ज्यूस, सिरप व मोलॅसेस यांच्यापासून इथेनॉल निर्मिती होत असल्याने त्याचा कारखान्यांना व शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे.

Ethanol
संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता महिला फाइटर पायलट होणार पर्मनंट

‘गंगामाई’ची क्षमता सर्वांत जास्त

सध्या सर्वांत जास्त इथेनॉलनिर्मितीची क्षमता गंगामाई कारखान्याची आहे. तेथे रोज २५० किलोलिटर (केएलपीडी) इथेनॉलनिर्मिती होऊ शकते. त्याखालोखाल विखे पाटील कारखान्यात रोज २३० केएलपीडी इथेनॉल तयार होऊ शकते. एक केएलपीडी म्हणजे एक हजार लिटर. इतर कारखान्यांतही कमीत कमी २० पेक्षा जास्त केएलपीडी इथेनॉल बनविण्याची क्षमता आहे. सर्वच कारखान्यांनी इथेनॉल बनविल्यास नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात निर्मिती शक्य आहे. सहकारी साखर कारखाने जास्त असल्याने त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना मिळू शकेल.

कारखान्यांची इथेनॉलची निर्मिती क्षमता (आकडे किलो केएलपीडीमध्ये)

  • अगस्ती सहकारी साखर कारखाना ३०

  • अंबालिका शुगर प्रा. लि. ६०

  • अशोक सहकारी साखर कारखाना २०

  • लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना ३०

  • गंगामाई कारखाना २५०

  • डॉ. विखे पाटील २३०

  • भाऊसाहेब थोरात कारखाना ४०

  • शंकरराव कोल्हे (संजीवनी) १२०

  • साईकृपा कारखाना ६०

साखर कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीकडे वळले पाहिजे. केंद्राकडून त्यासाठी प्रोत्साहन मिळते. अहमदनगर जिल्हा उसाचे आगार आहे. त्यामुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती शक्य आहे. कारखान्यांनी मागणी केल्यास लगेचच त्यांना निर्मितीचा परवाना देण्यात येत आहे.

- मिलिंद भालेराव, सहसंचालक (साखर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com