अहिल्यानगर: शहरातील जैन समाजाची ऐतिहासिक जागा व त्या ठिकाणी असलेल्या मंदिराची जागा विकण्यात आली आहे. नियम डावलून या जागेचा विक्री व्यवहार झाला आहे. या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावेत, विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी लढा उभारणार असल्याचे पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी अहिल्यानगर येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.