Satyajeet Tambe: पेपरफुटीने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेचा बुरखा फाडला: आमदार सत्यजित तांबे; ४ लाख २८ हजारांहून उमेदवारांवर अन्याय

Maharashtra recruitment exam paper leak latest news: टीईटी पेपरफुटीमुळे ४.२८ लाखांहून अधिक उमेदवारांचे भविष्य धोक्यात; तांबे यांचा परीक्षा व्यवस्थेच्या संपूर्ण पुनर्रचनेचा सरकारला इशारा
Satyajeet Tambe
Satyajeet Tambesakal
Updated on

संगमनेर: शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीची घटना समोर आल्याने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्‍वास पुन्हा एकदा डळमळीत झाला आहे. ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. तब्बल ४ लाख २८ हजारांहून अधिक उमेदवारांवर अन्याय झाला. ही केवळ पेपरफुटीची घटना नसून, राज्यातील भ्रष्ट आणि ढासळलेल्या परीक्षा व्यवस्थेचे अपयश असल्याची टीका विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com