
कोल्हार: राज्य उत्पादन शुल्कच्या कोपरगाव विभागाने शिरसगावमध्ये (ता.श्रीरामपूर) बनावट विदेशी मद्य विकणाऱ्यास अटक केली. आरोपीकडून एक लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. अहिल्यानगरच्या राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रमोद सोनेने, उपअधीक्षक प्रवीणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव विभागाचे निरीक्षक एस. एस. हांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.