
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचा बनावट जीआर दाखवून ठेकेदाराने पाच कोटी ५६ लाखांची कामे लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कामे लाटणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय चिर्के (रा. देऊळगाव सिद्धी, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे मंजुरी मिळालेल्या नगर तालुका, नेवासे, श्रीगोंदा येथील ३३ कामांवर गंडांतर आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आणखी काही ठेकेदारांचा समावेश असून, त्यांच्यावरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.