गटविकास अधिकाऱ्यांनी गिळलेली लाचेतील ‘ती’ नोट गेली कोणीकडे

शांताराम काळे
Saturday, 18 July 2020

गट विकास अधिकारी यांच्यावर छापा घातला व अटक केली. या मागे एक पुढारी ठेकेदाराने व कर्मचारी संगनमत करून खोटा गुन्हा दाखल केला.

अकोले (अहमदनगर) : गट विकास अधिकारी यांच्यावर छापा घातला व अटक केली. या मागे एक पुढारी ठेकेदाराने व कर्मचारी संगनमत करून खोटा गुन्हा दाखल केला. याबाबत आदिवासी पेसा अंतर्गत असलेल्या 40 गावच्या सरपंचांनी संतप्त होत एकत्र येऊन या अधिकाऱ्यास दिलेली ‘ती’ नोट कुठंय ती दाखवा अन्यथा फसवणूक करणाऱ्या ठेकेदार व त्यांच्या मागे असणाऱ्या पुढाऱ्यांची चौकशी करून गटविकास अधिकारी यांना न्याय मिळावा, अशी एकमुखी मागणी करून सरपंचांनी  जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग नाशिक यांना निवेदन पाठवून केली आहे. तर राज्यातील पहिली पेसा सरपंच परिषदेची स्थापना करून सरकारकडे १० मागण्याचे निवेदन दिले आहे.

अहमदनगरमधील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळी १० वाजता राजूर विश्रामगृहावर तालुक्यातील 40 सरपंच, आदिवासी विकास परिषद कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी सामाजिक अंतर पाळत सभा घेतली. यावेळी सरपंच गणपत देशमुख, उपसभापती दत्तात्रय देशमुख, चंद्रकांत गोंदके, काशीनाथ भांगरे, सुरेश भांगरे, अंजना कोरडे, सुरेश हिले, सोमनाथ, दीपक देशमुख, वाळेकर, कौठवाड, वाजुळशेत, रतनवाड, रंध, भंडारदर, माळेगाव, वारुघुश, मान्हेरे, खडकी, मुरशेत, गोंदोशी, सोमलवादी, कोहणे, कोहंडी, तिरंडे, राजूर, करंदी, कातळापुर, पळसूदे, कुमशेत अशा 40 गावातील सरपंच, महिला उपस्थित होत्या. 

चंद्रकांत गोंदके म्हणाले, आदिवासी भागातील सरपंच, अधिकारी यांना ठेकेदार पुढारी ब्लॅकमेलिंग करत असून आदिवासी महिला सरपंच व ग्रामसेवकानाही त्रास देऊन आदिवासी समाजाला त्रास देण्याचे काम करत आहेत. हे थांबले नाही तर आम्ही सर्व सरपंच रस्त्यावर उतरू. गटविकास अधिकारी यांना दोन वर्षांपासून टार्गेट बनवून स्थानिक निलंबित कर्मचारी व ठेकेदाराला हाताशी धरून खोटे आरोप करून त्यांना गुंतविले आहे. नोटा देण्याचा प्रश्न ठेकेदाराला का निर्माण झाला.  नोट घेतली तर त्या नोटा कुठे आहेत, याचे उत्तर द्यावीत. सरपंच पुष्पां भांगरे यांनी गटविकास अधिकारी पैसे घेऊच शकत नाहीत. घरकुल योजनेत अनेक गरिबांना निधी देताना कधीही त्यांनी आर्थिक मागणी केली नाही, असे आम्ही सरपंच ठामपणे सांगतो. यामागे षडयंत्र असून याची कसून चौकशी करावी, अन्यथा संबंधित ठेकेदार व पुढारी यांचेवर महिला ग्रामसेवक, सरपंच, अधिकारी यांच्यावर आदिवासी समाजाचे असल्याचा राग धरून करीत असलेल्या कारवाईला जशास तसे उत्तर द्यावे लागेल. यावेळी पांडुरंग खाडे, सीताराम वाळेकर, गणपत देशमुख यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या मोठ्या संख्येने आदिवासी सरपंच, महिला व कार्यकर्ते  सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होते.

संपादन : आशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: False offense against Akole Panchayat Samiti blok development officer