... अन्‌ शेतकऱ्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

कांदाविक्री केल्यानंतर व्यापाऱ्याकडून पावणेतीन लाखांचा धनादेश शेतकऱ्याला मिळाला. पैशांची गरज असल्याने त्याने तो बॅंकेत जमा केला. मात्र, दीड महिना हेलपाटे घालूनही पैसे जमा झाले नाहीत. शेतकऱ्याने चौकशी केली. धनादेश गहाळ झाल्याचे बॅंकेकडून सांगण्यात आले. संबंधित व्यापाऱ्याने पुन्हा धनादेश द्यावा, असे पत्र बॅंकेने शेतकऱ्याला दिले; परंतु पैसे मिळण्यात दिरंगाई होत होती. शेतकऱ्याने ही कैफियत राहुरी बाजार समितीच्या सभापतींपुढे मांडली नि दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग झाले. त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. 

नगर ः कांदाविक्री केल्यानंतर व्यापाऱ्याकडून पावणेतीन लाखांचा धनादेश शेतकऱ्याला मिळाला. पैशांची गरज असल्याने त्याने तो बॅंकेत जमा केला. मात्र, दीड महिना हेलपाटे घालूनही पैसे जमा झाले नाहीत. शेतकऱ्याने चौकशी केली. धनादेश गहाळ झाल्याचे बॅंकेकडून सांगण्यात आले. संबंधित व्यापाऱ्याने पुन्हा धनादेश द्यावा, असे पत्र बॅंकेने शेतकऱ्याला दिले; परंतु पैसे मिळण्यात दिरंगाई होत होती. शेतकऱ्याने ही कैफियत राहुरी बाजार समितीच्या सभापतींपुढे मांडली नि दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग झाले. त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. 

हेही वाचा नियोजन मंडळाचा निधी आमदारांना देणे चुकीचे, हर्षदा काकडे यांची टीका 

ज्ञानेश्वर आहेर (रा. नाराळा, ता. वैजापूर), असे या शेतकऱ्याचे नाव. आहेर यांनी राहुरी बाजार समितीत केलेल्या कांदाविक्रीतून अडत व्यापारी संजय कोळसे यांनी त्यांना 2 लाख 65 हजार रुपयांचा धनादेश दिला. आहेर यांनी तो बॅंकेत भरला. चार-पाच दिवसांत खात्यावर पैसे वर्ग होतील, असे बॅंकेतून सांगण्यात आले; मात्र पैसे जमा झाले नाहीत. त्यावर विचारणा केली असता, अजून काही दिवस लागतील, असे बॅंकेने सांगितले. मात्र, दीड महिना उलटूनही पैसे जमा झाले नाहीत. बॅंकेत चौकशी केली असता, "धनादेश गहाळ झाला असून, तो परत आणावा,' असे सांगण्यात आले. 

हेही वाचा श्री विशाल गणेश अवतरणार भाविकांच्या घरी 

शेतकऱ्याने अडत व्यापारी संजय कोळसे यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली. कोळसे यांनी, "धनादेश हरवल्याचे बॅंकेचे पत्र पाठवा, मी लगेच दुसरा धनादेश देतो; नाही तर थेट खात्यावर पैसे जमा करतो,' असे सांगितले. बॅंकेकडून पत्र घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच लॉकडाउन जाहीर झाले नि सगळे व्यवहार थांबले. बॅंकेचे पत्र मिळाले; मात्र ते व्यापाऱ्यापर्यंत पोचवायचे कसे, असा प्रश्न उभा राहिला. पैशांची गरज असल्यामुळे आहेर यांनी सभापती अरुण तनपुरे यांच्यासमोर व्यथा मांडली. त्यांनी तातडीने कोळसे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. बॅंकेत धनादेश वटला की नाही, याची खातरजमा केल्यानंतर कोळसे यांनी शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे लगेच वर्ग केले. रक्कम खात्यावर जमा होताच शेतकऱ्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. 

राहुरी बाजार समितीचा कारभार पारदर्शक असून, व्यापाऱ्यांचेही व्यवहार चोख आहेत. येथे कोणाची अडवणूक होत नाही. बॅंकेकडून धनादेश हरवल्यामुळे व त्यानंतर लॉकडाउनमुळे शेतकऱ्याला पैसे मिळण्यास विलंब झाला. 
- अरुण तनपुरे, सभापती, बाजार समिती, राहुरी  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmer got the money from the sale of onions