एक्सप्रेस-वेसाठी जमिनींचा बाजारभावाप्रमाणे मोबदला हवा; शेतकऱ्यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Express-Way

एक्सप्रेस-वेसाठी जमिनींचा बाजारभावाप्रमाणे मोबदला हवा | Ahmednagar

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (जि. नाशिक) : सुरत- हैदराबाद एक्सप्रेस ग्रीनफिल्ड महामार्गासाठी भूसंपादन करतांना जमिनींचे स्थानिक बाजारमूल्य विचारात घेऊन प्रथम मोबदला जाहीर करावा. नंतरच भूसंपादनाची कार्यवाही करावी. अन्यथा, येत्या मंगळवारी (ता. ३०) राहुरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले जाईल. असा इशारा राहुरी तालुक्यातील प्रकल्पबाधित १९ गावांमधील शेतकऱ्यांनी दिला आहे.

तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की,

"सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्गासाठी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बागायती व फळझाडे असणारे क्षेत्र संपादीत करणेबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर इतर हक्कात सुरत एक्सप्रेस ग्रीन फीड अहमदनगर, नाशिक नवीन राष्ट्रीय महामार्ग अधिसूचना ३ (अ) नुसार संपादीत क्षेत्र हस्तांतर बंदी. अशी नोंद करण्याबाबत सक्षम भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर यांचेकडून तलाठी कार्यालयास पत्रव्यवहार झाला आहे."

सुरत- हैदराबाद एक्सप्रेस ग्रीनफिल्ड महामार्गासाठी भूसंपादन करतांना जमिनींचे स्थानिक बाजारमूल्य विचारात घेऊन प्रथम मोबदला जाहीर न करता भूसंपादन केल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा राहुरी तालुक्यातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.

सुरत- हैदराबाद एक्सप्रेस ग्रीनफिल्ड महामार्गासाठी भूसंपादन करतांना जमिनींचे स्थानिक बाजारमूल्य विचारात घेऊन प्रथम मोबदला जाहीर न करता भूसंपादन केल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा राहुरी तालुक्यातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा: कोरोना-मृत्यूंचे आकडे जुळेनात

"शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, शेतकऱ्यांच्या हरकती विचारात न घेता, हुकूमशाही पद्धतीने कार्यवाही करण्यात येत आहे. राजपत्रात बागायती जमिनीच्या नोंदी जिरायती क्षेत्र म्हणून केलेल्या आहेत. त्या चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्यात याव्यात. जमिनीचे स्थानिक बाजार मूल्य विचारात घेऊन प्रथम मोबदला जाहीर करावा. नंतरच पुढील कार्यवाही करावी. शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर इतर हक्कात केलेली महामार्गाची नोंद तात्काळ रद्द करावी. शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी सर्व्हिस रोड व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात." आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.

मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या मंगळवारी (ता. ३०) राहुरी तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील १९ गावातील प्रकल्पबाधित शेतकरी आपल्या हक्कासाठी बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. असेही निवेदनात म्हंटले आहे. निवेदनावर वांबोरी, खडांबे खुर्द, खडांबे बुद्रुक, सडे, डिग्रस, राहुरी बुद्रुक, राहुरी खुर्द, मोमीन आखाडा, मल्हारवाडी, चिंचविहीरे, वडनेर, तांभेरे, तांदूळनेर, माळेवाडी - डूक्रेवाडी, सोनगाव, धानोरे येथील शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

हेही वाचा: अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदासाठी 'फिल्डिंग'

loading image
go to top